माझा मित्र, स्वप्नीलचा मेसेज आला की ट्रेक क्षितिज संस्थेचा हा जरा offbeat trek आहे आणि मी लगेच त्याला जायचे निश्चित केले. या आडबाजूला फारसं कोणी जात नाही. बागलाण तालुक्यात हे चार किल्ले आहेत. नावांवरून तर ते किल्ले वाटतच नाहीत.
१३/०१/१७ च्या रात्री नाशिक
ला पोचून सटाण्याला निघालो. पहाटे कोटबेलला पोचलो. गावातून बरोबर पश्चिमेला किल्ला दिसतो. पण पायथा गाठायला आधी शेते आणि नंतर एक छोटी टेकडी ओलांडावी लागते. किल्ल्याचा कातळ जवळ आला की तो उजवीकडे ठेवून चढत राहायचे की आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. वर पाण्याची टाकी वगळता दुसरं काही नाही. येताना मात्र गावापर्यंतची तंगडतोड वैताग आणते.
आता लक्ष्य होते कर्हा किल्ला. कोळीपाडा गावात आलो. तिथून किल्ला २५० मीटर उंच दिसत होता. पायथ्याशी आधी जेवून घेतले. एकाच दिशेने दोन टप्प्यांत चढण आहे. मुरमाड घसारा आहे अधूनमधून. वर एक छोटेसे देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची अठरा हातांची मूर्ती आहे. पाण्याची टाकी आहेत, पण पाणी खराब आहे. जेवण झाल्यामुळे आणि लगेच पटापट चढल्यामुळे दमलो होतो, त्यामुळे तिथे पाठ टेकताच जरा डुलकी लागली. अशावेळी झोप कशी लागते हे एक नवलच आहे. खाली खडबडीत जमीन, वरून ऊन, आजूबाजूला थोडी गडबड-बडबड तरीपण १५ मिनिटे तरी गाढ झोप लागली. अर्ध्या तासात उतरून खाली आलो.
आता पुढचा स्टाप होता, देवळाणेचे शिवमंदिर. पूर्णपणे दगडात बांधलेले आणि सुस्थितीत असलेले असे हे मंदिर आहे. आश्चर्य म्हणजे देवळाच्या बाहेरील बाजूस मिथुनशिल्पे कोरलेली आहेत. अशा ठिकाणी असे काही पाहायला मिळेल अशी जरा सुद्धा कल्पना नव्हती.
तिथून जवळच दुंधा तळवडे गावात आलो. गावापासून किल्ल्याचा पायथा दोन किलोमीटरवर आहे. पायथ्याला आश्रम आहे. अजून सूर्य मावळला नव्हता म्हणून लगेच किल्ल्यावर जायचं ठरवलं. एका दिवसात तीन किल्ले जरा जास्तच होतात. पण त्याचा फायदा उद्या होणार होता म्हणून जड झालेले पाय पुन्हा चालते करून वर निघालो. याच एकमेव किल्ल्यावर जरा झाडी आहे. कातळात खोदलेल्या पायर्या आहेत. वीस मिनिटात वर आलो. वर छोटेसे मंदिर, आश्रम आहे. गोरखचिंचेचे दोन विशाल वृक्ष आहेत जे मी पहिल्यांदाच पाहिले. याची फळे औषधात वापरतात. उजव्या बाजूने गेल्यावर थोडे खालच्या बाजूला कातळात देव टाके आहे, यातले पाणी पिण्यासाठी चांगले आहे. डाव्या बाजूला अजून एक टाके आहे पण पाणी चांगले नाही. अंधार पडायला लागला तसं आम्ही उतरायला सुरुवात केली. खाली येईपर्यंत चांगलाच अंधार झाला. आजूबाजूच्या गावातले दिवे उजळले होते. पायथ्याच्या मंदिराच्या समोर एक सभागृह आहे. तिथे सर्वांनी सॅक टाकून जागा पटकावल्या. खूप थंडी असेल असे वाटत होते पण मंदिराच्या तीन बाजूने डोंगर आणि झाडे असल्याने थंड वारे म्हणावे तेवढे वाहत नव्हते.
आधी चहा, मग सूप आणि शेवटी भात-खिचडी असे भरपेट जेवण झाले. मला तशी मुक्कामी ट्रेकला झोप नीट लागत नाही पण स्लीपिंग बॅगमध्ये झोपही बरी लागली.
दुसरा दिवस : आज एकच किल्ला करायचा असल्याने निवांत होतो. अजमेर सौंदाणे मार्गे पहाडेश्वर मंदिर येथे आलो. मंदिरामागेच अजमेरा किल्ल्याचा पहाड आहे. खालून सर्वोच्च माथा दिसत नाही. अर्ध्या तासात माचीसारख्या टप्प्यावर पोचलो. इथून किल्ला डावीकडे ठेवून वळसा मारून माथ्यावर पोचलो. भन्नाट वार्याने स्वागत केले. छान मस्त मोकळी शुद्ध हवा. ही हवा शहरात धुराच्या मार्यात हरवून जाते. अश्या हवेसाठी आपण किती आसुसलेले असतो ते इथे आले की कळते. किती वेळ झाला तरी हवा अंगाला बिलगून जातच होती. गवत वाळलेले होते तरीही त्यावर छान लहरी उठत होत्या. किल्ला खूप लांब पसरलेला आहे. पलीकडच्या टोकाला ध्वजस्तंभ आहे. तर मध्यभागी शंकराची पिंड आणि नंदी. टाके पण आहे पण पाणी खराब.
अशा स्वच्छंद वातावरणात कोणतेच टेन्शन जाणवत नाही. घड्याळात किती वाजलेत ते पण बघावसं वाटत नाही. खूप दूरपर्यंत शेती आणि शेततळी यांचेच दृश्य दिसत होते. खाली उतरताना पुन्हा ट्रेक क्षितिज बरोबर ट्रेकला जायचे हे ठरवूनच टाकले.

![]() |
| Bishta fort from kotbel |
![]() |
| Bishta fort - close look |
![]() |
| Bishta fort - climbing |
![]() |
| Temple at Devlane village |
![]() |
| Information at the base of Dundha |
![]() |
| Gorakhchinch at Dundha |
![]() |
| Mithunshilpa |
![]() |
| Ajmera fort from Pahadeshwar temple |
![]() |
| Top of Ajmera |
![]() |
| Water cistern at Ajmera |
![]() |
| Carved decorative pillar |
![]() |
| Temple at the base of Dundha - place for night stay |
![]() |
| Karha from base |
![]() |
| Temple at the top of karha |
![]() |
| Devi temple at the base of Karha |